राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी ? औरंगाबाद मधूनही ‘ही’ नावे चर्चेत

Foto
औरंगाबाद : काही दिवसापूर्वी  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी अचानकपणे राजीनामा दिला आहे. आपल्या पदाची मुदत संपल्याने आपण राजीनामा दिल्याचे अजिंक्यराणा पाटील यांनी स्पष्ट केले. तर आपण युवक राष्ट्रवादीत काम करण्यास इच्छुक असून मला संधी द्यावी अशी इच्छा देखील अजिंक्यराणा यांनी बोलून दाखवली आहे.

आता विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाल्याने या पदासाठी अनेक नावं चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीने पक्षात अनेक युवकांना संधी दिली आहे. त्यामुळे विध्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महत्व त्या अर्थाने अधिक वाढले आहे. 

नवीन प्रदेशाध्यक्षपदी प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे, मयूर सोनवणे (औरंगाबाद), ऋषिकेश देशमुख (औरंगाबाद),  मयूर पटारे (अहमदनगर) कन्हैया कदम (नांदेड) यांची नावे चर्चेत आहे.

यामध्ये विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे यांचे नाव चर्चेत आहे. मी एका सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. जर मला संधी मिळाली तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी लढेल. अशी भूमिका आकाश झांबरे यांनी मांडली आहे. आकश झांबरे हे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि त्याचं नावं आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे

मराठवाड्याला मिळणार संधी

औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर सोनवणे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यांची या पदावर निवड झाल्यास मराठवाड्याला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. मयूर सोनवणे हे शरद पवार यांच्या आशीर्वादाने व अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नासाठी रस्त्यावर आंदोलने करतात. प्रत्येक कामासाठी त्यांच्या पाठीमागचे सतीश चव्हाण यांचा पाठिंबा असतो.  प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल. 

मराठवाड्यातील ऋषिकेश देशमुख हे देखील विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छूक आहेत. विद्यार्थी चळवळीचा दांडगा अनुभव असलेले विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेश सदस्य आणि औरंगाबाद राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष देशमुख हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. आपण प्रदीर्घकाळ विद्यार्थी संघटनेत काम केलेले असून  विद्यार्थी चळवळीचा मोठा अनुभव आहे. प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आक्रमकतेने वाचा फोडू, असं देशमुख यांनी सांगितले.

त्याचबरोबर विध्यार्थी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मयुर पटारे याचं देखील नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये समोर येत आहे. मयुर पटारे हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पक्ष देईल ती जबादारी स्वीकारेल. पक्षात काम करताना वेळोवेळी मला आमदार रोहित पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे ते यापुढे देखील घेईल. जर मला संधी मिळाली तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आक्रमकतेने मांडेल. असं पटारे यांनी सांगितल आहे.

विद्यमान विद्यार्थी प्रदेश संघटक दयानंद शिंदे हे देखील या पदाच्या शर्यतीत आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. असं शिंदे म्हणाले आहेत. तर रोहित पावर सारख्या युवा नेत्यांच्या विचारसरणीचा विद्यार्थी संघटनेत काम करताना नक्कीच फायदा होतो. 

पुण्यातून सनी मानकर यांच्या नावाची देखील विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नांदेड, बीड, हिंगोलीमधूनही इच्छूकांची नावं समोर येत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker